डॉ.श्रीकांत जिचकार
डॉ. श्रीकांत जिचकार
एकच व्यक्ती
डॉक्टर होते,
ते वकिलही होते,
ते आयपीएस
अधिकारी
तसंच आयएएस अधिकारी होते.
याशिवाय
ते पत्रकारही होते.
इतकंच नाही तर किर्तनकार, आमदार,
खासदार आणि मंत्रीही होते.
इतक्या पदव्या मिळवणारे ज्ञानयोगी म्हणजे
" डॉ. श्रीकांत जिचकार "
होय.
डॉ. श्रीकांत जिचकार यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
डॉ. श्रीकांत जिचकारांचा २००४ साली अपघाती मृत्यु झाला आहे. याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं आहे. तसंच डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे डॉ. श्रीकांत जिचकार होय.
अवघ्या ४९ वर्षांचं जीवन,
४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं
असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.
आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
पदव्यां मिळवण्याचा विक्रम डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
डॉ. श्रीकांत जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये
एमबीबीएस आणि एमडी,
एलएलबी, एलएलएम, डीबीएम
आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.
डॉ. श्रीकांत जिचकरांनी १० विषयांत एम ए केलं.
यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,
राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे.
डॉ. श्रीकांत जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट
ही पदवी मिळवली.
डॉ. श्रीकांत जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून
मिळवल्या आहेत.
डॉ. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित
व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झ-याने ज्ञानदेवतेलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच
आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, आजीवन विद्यार्थीच राहीले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home