मेजर रामा राघोबा राणे
|| छत्रपती सुत्र ||
● मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पाने ●
-- मेजर रामा राघोबा राणे --
www.facebook.com/chhatrapatisutra
जीवनक्रम :
जन्म -२६ जुन १९१८ चेंदीया,उत्तर कन्नड,कारवार,कर्नाटक येथील मराठा कुटुंबात.
मृत्यु - ११ जुलै १९९४ दक्षिण कमांड हॉस्पिटल पुणे.
सेवाकाळ - १९४७ ते १९६८
पदवी - मेजर
युध्द - भारत-पाकिस्तान १९४७
पुरस्कार - परमवीर चक्र (भारतातील दुसरे व्यक्ति १९४८)
इतर पुरस्कार - पाच वेळा Mentioned-In-Dispatches अवॉर्ड.
रामा राघोबा राणे यांचा पराक्रम :
२२ ऑक्टोबर १९४७ रोजी सुरू झालेले भारत-पाक युद्ध डिसेंबर १९४८ पर्यंत चालु होते.
डिसेंबर १९४७ मधे शत्रेने झांगर ताब्यात घेतले होते.परंतु मेजर आत्मसिंह यांची चौथी डोगरा रेजीमेंट तुकडी राजौरी या ठिकाणी पोचण्यापुर्वीच १८ मार्च १९४८ ला भारतीय आर्मीने झंगर ताब्यात घेउन शत्रुला मागे सारले.परंतु पाकिस्तानी सैन्य मागे सरत असताना त्यांनी राजौरी व पुंछ यामधला नैशनल हायवे सुरुंग लाऊन नष्ट केला.
रस्ता नसल्यामुळे आत्मसिंह यांच्या तुकडीने नौशहरा मार्गे राजौरी ला पोचण्याचा प्रयत्न केला.नौशहरा पासुन ११ किमी वरील बरवाली या शत्रु तळावर ८ एप्रिल १९४८ ला हल्ला करुन त्यांनी शत्रुला अजुन मागे सारले.परंतु बरवाली पासुन पुढचा रस्ता अतिशय खराब होता.त्यातच या रस्त्यावर पाकिस्तानी सैन्याने भुसुरुंग पेरले होते.त्यामुळे भारतीय सैन्याच्या रणगाडे व वाहनांना पुढे जाता येत नव्हते.हे रणगाडे व वाहने पुढे न गेल्यास शत्रुला नेस्तनाबुत करणे शक्य नव्हते.
अशा कठीण परीस्थितीत मार्ग काढण्यासाठी तिशीतल्या एका तडफदार व उमद्या अधिकाऱ्याने आपली कंबर कसली.सेकंड लेफ्टनंट पदावर कार्यरत असणाऱ्या "रामा राघोबा राणे" या मर्द मराठा मावळ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता "हर हर महादेव" "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा गर्जनेत आपली ३७ असाल्ट फिल्ड कंपनी आणि आत्मसिंह यांच्या चौथी डोगरा रेजिमेंट तुकडीच्या साथीने आपल्या अतुलनीय साहसाच्या प्रदर्शन करत ८ एप्रिल १९४८ रोजी पाकिस्तानी सैन्याने पेरलेले भुसुरुंग हटवण्याचे काम चालु केले.
एक एक भुरुंग हटवत ते आपल्या रणगाड्यांना वाट करत होते.हे करत असताना एका बाजुने पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करायला सुरुवात केली.या गोळीबारात भुसुरुंग शोधणारे दोन कॉम्बैट इंजिनियर मृत्युमुखी पडले आणि लेफ्टिनेंट राणेंसोबत पाच जण जबर जखमी झाले.
अशा जखमी अवस्थेत सुध्दा राणेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भुसुरंग हटवण्याचे काम त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत चालु ठेवले आणि आपल्या सेनेच्या रणगाड्यांना पुढे जाण्यासाठी वाट केली.
आपले काम रात्री सुध्दा सुरुच ठेवत ९ एप्रिल च्या सकाळपर्यंत म्हणजे सलग १४-१५ तास त्यांनी भुसुरुंग हटवण्याचे काम चालु ठेवले.दुसरीकडुन गोळीबार चालुच होता.पाकिस्तानी सैन्याने पुढे तर खुपच अडचणी निर्माण केलत्या.परंतु न थकता राणे आपले काम करत राहीले.जिथे रस्ता नसेल तिथे नवीन रस्ता सुध्दा बनवला गेला.१० एप्रिल च्या सकाळपर्यंत त्यांनी पाच मोठे देवदार वृक्ष पाडुन रस्ता बनवला.इथपर्यंत सेना १३ किमी पर्यंत पुढे आली होती,यावरुनच त्यांनी किती काम केले हे लक्षात येईल.
जसजसे त्यांचे काम चालु होते,तसतशी भारतीय सेना पुढे कुच करत होती.११ एप्रिलच्या सकाळी त्यांनी चिंगस व त्यापुढील रस्ता साफ केला.८ एप्रिल च्या सकाळ पासुन ११ एप्रिल च्या दुपारपर्यंत सलग त्यांचे भुसुरुंग हटवण्याचे काम चालु होते.शेवटी सगळे भुसुरुंग हटवले गेले आणि भारतीय सैन्याला राजौरी पर्यंत पोचण्याची वाट मोकळी झाली.नंतर लेफ्टिनेंट राणेंनी स्वतः रणगाड्यावर बसून आपल्या पलटणीला सुखरूप बाहेर काढत पाकिस्तानच्या सेनेवर तोफाखान्याने हल्ला चढवला आणि पाकिस्तानी सैन्य बेचिराख करुन टाकले.त्यांच्या हल्ल्यात ५००हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि कित्येक जखमी झाले.
राणे यांच्या या पराक्रमाने चिंगस आणि राजौरीतील कित्येक निष्पाप लोकांचे प्राण वाचले.पुंछ,मीरपूर,बेरीपटम व कोटली भागात सैन्य,रसद व दारुगोळा पोहोचवणे शक्य होऊन ब्रिगेडेयर प्रितमसिंग यांना पूंछाचा संपूर्ण भाग जिंकता आला.
लेफ्टनंट रामा राघोबा राणे या तरुण इंजिनीअर मर्द मराठ्याच्या नेतृत्ववाली बॉम्बे सॅपर्स पलटणीने भुसुरुंग नष्ट करत साहसी वृत्तीने शत्रुला नामोहरम करत चोख उत्तर देत राजौरी,झांगर,पुंछ हा भाग भारताच्या ताब्यात ठेवला.लेफ्टिनेंट राणे यांच्या कुशल नेतृत्वाने,धडाडी दाखवत दोन हजार पाकिस्तानी सैन्याचा वेढा मोडून काढत आपल्या सहकाऱ्यांचे सुध्दा प्राण वाचवले.
तत्कालीन लष्करप्रमुख असणाऱ्या करीअप्पा यांनी लेफ्टिनेंट रामा राघोबा राणे यांचा पराक्रम पाहून त्यांना "परमवीर चक्र" राणेंच्या जीवंतपणी प्रदान केले.
लेफ्टिनेंट रामा राघोबा राणे यांना परमवीर चक्र मिळाले व भारतीय लष्करात मराठ्यांच्या शौर्याची साहसी परंपरा निर्माण झाली.
सध्या राणेंचे परमवीर चक्र पुण्याच्या बॉम्बे सॅपर्सच्या शौर्य संग्रहालयामध्ये सन्मानपूर्वक ठेवण्यात आले आहे.त्याच्याकडे पाहुन तरुण अधिकाऱ्यांना सतत स्फूर्ती मिळत राहील.
मेजर रामा राघोबा राणे यांना मानाचा मुजरा.
अधिक माहिती -
http://satyameva-jayate.org/2010/04/08/rama-raghoba-rane/
http://en.wikipedia.org/wiki/Rama_Raghoba_Rane
!! जय शिवराय !!
!! जय हिंद !!
!! जयोस्तु मराठा !!
- अनिल माने.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home